

Integrity of Jamgaon Citizens Saves Farmer's Livelihood
Sakal
कायगाव: "माणुसकी अजून जिवंत आहे" याचा प्रत्यय देणारी हृदयस्पर्शी घटना गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे घडली आहे. सणासुदीच्या गडबडीत हरवलेल्या आणि तब्बल अडीच ते तीन लाख रुपये किमतीच्या 27 बकऱ्या मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी दिवसभर सांभाळून मूळ मालकाच्या स्वाधीन केल्या.