agitation in water
sakal
वाशी - तालुक्यातील पारगाव जनकापूर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल महिनाभरापासुन खचलेला असल्याने वाहतूक बंद पडुन प्रामुख्याने विद्यार्थ्यांना, ग्रामस्थांना तारेवरची कसरत करत पायी चालुन पारगाव येथे विविध कामासाह शाळेसाठी यावे लागत असल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाला निवेदन देऊन जलसमाधी आंदोलनाचा ईशारा दिला होता.