

Jashodaben Modi visits Parli Vaijnath Jyotirlinga
esakal
नितीन चव्हाण
बीड: जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी आणि पंतप्रधानांचे बंधू अशोक मोदी यांनी मंगळवारी तीर्थक्षेत्र परळी येथील पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांच्या मंदिरात दर्शनासाठी भेट दिली. अतिशय साध्या वेशभूषेत आणि भक्तिमय वातावरणात त्यांनी प्रभू वैद्यनाथांची विधीवत पूजा आणि आरती केली.