
Sindphana River
sakal
शिरूरकासार : तालुक्यातील जाटनांदूर येथे सिंदफणा नदीवरील जलसंधारण विभागाने उभारलेला पाझर तलाव फुटल्याने भीषण महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काल मध्यरात्री हा तलाव फुटला आणि त्याचे पाणी थेट सिंदफणा नदीच्या पात्रात आल्याने नदीला महापुर आला. या पुरामुळे जवळपास २० गावांतील शेतीसह हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.