

Agrarian Crisis: Backwater Flooding of Jayakwadi Dam Devastates Gangapur Farms
Sakal
कायगाव : जायकवाडी धरणाच्या फुगवट्यामुळे अंमळनेर व लखमापूर (ता. गंगापूर) परिसरातील शेतीचे गेल्या वीस वर्षांपासून मोठे नुकसान होत असून, भरपाई व संपादनाबाबत प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १८) अंमळनेर शिवारात गोदावरी पात्रात जलसमाधी आंदोलन छेडले. प्रशासनाच्या विनंतीनंतर रात्री साडेनऊ वाजता जलसमाधी आंदोलन मागे घेऊन शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.