
जायकवाडी धरणातुन गोदावरी अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीकाठी असलेली शेतजमीन पुराच्या पाण्यात गेली. हाता तोंडाशी आलेला घास हिरावुन गेला. यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने दुसऱ्याच दिवशी जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यात घडली आहे.