
छत्रपती संभाजी नगरः मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाने यंदाच्या पावसाळ्यात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मागच्या २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. आज, सोमवारी (७ जुलै २०२५) दुपारी १२ वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा ५३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, पाण्याची आवक प्रतिसेकंद २२ हजार २२२ क्युसेक इतकी प्रचंड वेगाने सुरू आहे.