Jayakwadi Dam

Jayakwadi Dam

sakal

Jayakwadi Dam: पैठण व माजलगाव तालुके धोक्याच्या छायेत; धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने गोदाकाठची गावं संकटात

Godavari Flood: जायकवाडी धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडून तब्बल १,१३,१८४ क्युसेक पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. नदी दुथडी भरून वाहत असून, गोदाकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
Published on

टाकरवण : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि पैठण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात प्रचंड पाण्याची आवक झाली आहे. परिणामी, रविवारी (१४ सप्टेंबर) पहाटे सर्व २७ दरवाजे उघडून तब्बल १,१३,१८४ क्युसेक पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com