
"Jayakwadi Dam releases 2.5 lakh cusecs of water; Godavari riverside residents brace for a tense night."
-पांडुरंग उगले
माजलगाव: धरणाच्या पाणलोटक्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पैठणच्या जायकवाडी धरणाचे सर्वच दरवाजे उघडण्यात आलेत. रविवारी (ता. २८) रात्रीपर्यंत अडीच लाख क्युसेस वेगाने पाणी नदीपात्रात सोडल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. सावधगिरी म्हणून काही गावातील लोकांना स्थलांतर करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांनी केले.