

First water rotation released from Jayakwadi dam for Rabi season.
Sakal
छत्रपती संभाजीनगर : यंदा पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र भीषण दुष्काळाच्या खाईत लोटला गेला आहे. राज्य सरकारने ३०५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून मराठवाड्यात तर पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. अशा संकटकाळात मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. जायकवाडी प्रकल्पातून डाव्या आणि उजव्या कालव्यात रब्बी हंगामासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले असून, हे पाणी आता परभणी जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पाण्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले आहे.