Ramayana Box Office : अवघ्या ८ दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास! 'रामायण'ची १००० कोटींच्या क्लबमध्ये दणदणीत एन्ट्री; आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांची यादी पाहा!

1000 Crore Club Movies : 'बाहुबली २' आणि 'पठाण'चे रेकॉर्ड मोडले; रणबीर-यशच्या महाकाव्याने गाठला जगभरात १,०३३ कोटींचा टप्पा!
Strong box office collection globally by 'Ramayana: Part 1'

Strong box office collection globally by 'Ramayana: Part 1'

Sakal

Updated on: 

नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर, साई पल्लवी तसेच यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'रामायण: पार्ट १' या भव्य चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. ५ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या आठ दिवसांत जगभरात १,०३३.५५ कोटी रुपयांची विक्रमी कमाई करत प्रतिष्ठेच्या '१,००० कोटी क्लब'मध्ये दणदणीत प्रवेश केला आहे.

Loading content, please wait...