

Irrigation Department Directive: Mandatory 'No Dues' Certificate
sakal
मानवत : जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रातील शेतजमिनींच्या खरेदी-विक्री करताना 'नादेय (थकबाकी नसल्याचे) प्रमाणपत्र' बंधनकारक करण्यात यावे असे पत्र जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. २ परभणी यांनी दुय्यम निबंधक कार्यालयास पाठवले आहे. यामुळे मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आदेशामुळे लाभक्षेत्रातील १६ गावांमधील शेतजमिनींच्या व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.