कोठेही जाऊ नका सोबतच रहा, जयंत पाटलांचे काँग्रेसला आवाहन

औसा (जि.लातूर) : पालिकेच्या विविध विकास कामाचा प्रारंभ कार्यक्रमात बोलतांना जलसंपदामंत्री जयंत पाटील. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजीमंत्री बसवराज पाटील, आमदार विक्रम काळे, नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख आदी.
औसा (जि.लातूर) : पालिकेच्या विविध विकास कामाचा प्रारंभ कार्यक्रमात बोलतांना जलसंपदामंत्री जयंत पाटील. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजीमंत्री बसवराज पाटील, आमदार विक्रम काळे, नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख आदी.सकाळ
Summary

एकेकाळी चित्रपटसृष्टीत राजेश खन्ना, अमिताभ बच्चन कायमचे सुपरस्टर राहीले. किंबहुना त्यांच्यात याबद्दल स्पर्धा होती. मात्र त्या दोघा सुपरस्टार पेक्षा वेगळे असणारे धर्मेंद्र कधीही या स्पर्धेत न राहता त्याची लोकांच्या मनावर असलेली पकड सुपरस्टरपेक्षाही जास्त मजबुत होती.

औसा (जि.लातूर) : सध्या कॉंग्रेसमध्ये Congress Party स्वबळाचे वारे जोरात वाहत आहे. यावर आम्ही काही बोलणे योग्य नाही. मनात काहीही असले तरी तुम्हाला आणि आम्हाला बरोबरच जायचे आहे. तु्म्ही कोठेही जाऊ नका आमच्या सोबतच रहा. म्हणूनच महामंडळांच्या नियुक्त्या करताना आम्ही समानता बाळगली आहे. यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची आमची भुमिका असुन स्वबळाचा नारा हा तुमचाच अधिक आहे, असा चिमटा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील Nationalist Congress State President Jayant Patil यांनी कॉंग्रेसला काढला. कॉंग्रेस कार्याध्यक्ष बसवराज पाटील Basawaraj Patil यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांना उद्देशुन आघाडीत आम्हीही तिसरे महत्त्वपूर्ण घटक आहोत. आम्हालाही विचारात घ्या, असा टोला लगावला होता. त्याला उत्तर देतांना पाटलांनी स्वबळाचा नारा तुमचाच असल्याची आठवण करुन दिल्याने औशात राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या दोन पाटलांची जुगलबंदी रंगली. औशात शुक्रवारी (ता.२५) नगरपालिकेच्या Ausa Municipal Council विविध विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी श्री.पाटील बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे Social Justice Minister Dhananjay Munde, राज्यमंत्री संजय बनसोडे Sanjay Bansode, आमदार विक्रम काळ, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर Rupali Chakankar, युवक महिला अध्यक्षा सक्षणा सलगर, मुख्याधिकारी वसुधा फड, नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख, पालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बसवराज पाटीलांनी थोडी नाराजी व्यक्त करताना सांगितले की, आघाडी सरकारमध्ये आमचाही महत्त्वपूर्ण सहभाग असल्याने केवळ सेना-राष्ट्रवादीचे नाव घेण्यापेक्षा आमचेही नाव घ्या. सरकारमध्ये आम्हीही आहोत ही जाणीव जयंत पाटलांना करुन दिली. यावर जयंत पाटलांनी खुमासदारपणे याचे उत्तर देतांना राज्यात शिवसेना Shiv Sena हा एक नंबरचा मोठा पक्ष. त्यानंतर दोन नंबरवर राष्ट्रवादी, तर तीन नंबरला कॉंग्रेस आहे. आघाडी असल्याने आम्ही बोलतांना समान बोलतो. मात्र आपल्याकडूनच सध्या आघाडीधर्म विसरुन स्वबळाचा नारा दिला जात आहे. यामुळे तुमच्या मनात काय आहे हे दिसते. पण आमच्या मनात तुमच्याबद्दल काहीच नाही. आम्हाला तुमच्या बरोबरच जाण्याची मनापासूनची इच्छा आहे त्यामुळे तुम्ही कोठेही जाऊ नका? आता आपण सर्व समसमान आहोत, असे बोलल्याने एकच हशा पिकली.jayant patil appeal to congress don't be go alone stay with us

औसा (जि.लातूर) : पालिकेच्या विविध विकास कामाचा प्रारंभ कार्यक्रमात बोलतांना जलसंपदामंत्री जयंत पाटील. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजीमंत्री बसवराज पाटील, आमदार विक्रम काळे, नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख आदी.
मराठा आरक्षणाबाबत विनायक मेटे म्हणतात...

जयंतराव तुम्ही राजकारणातले धर्मेंद्र

एकेकाळी चित्रपटसृष्टीत राजेश खन्ना, अमिताभ बच्चन कायमचे सुपरस्टर राहीले. किंबहुना त्यांच्यात याबद्दल स्पर्धा होती. मात्र त्या दोघा सुपरस्टार पेक्षा वेगळे असणारे धर्मेंद्र कधीही या स्पर्धेत न राहता त्याची लोकांच्या मनावर असलेली पकड सुपरस्टरपेक्षाही जास्त मजबुत होती. राजकारणातील इतर सुपरस्टरपेक्षा आपली ईमेज ही धर्मेंद्रसारखी असुन आपल्यावर राज्यातील जनतेचे प्रेम आणि विश्वास आहे. आजारी असतानाही कारखान्याच्या अत्यंत अडचणीच्या वेळेस जयंतरावांनी केलेली मदत ही न विसरण्यासारखी असल्याने त्यांच्या मदतीमुळेच किल्लारी सहकारी साखर कारखाना विठ्ठलसाईला चालविता आला असल्याची स्तुती सुमने कॉंग्रेस कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर उधळली.

औसा (जि.लातूर) : पालिकेच्या विविध विकास कामाचा प्रारंभ कार्यक्रमात बोलतांना जलसंपदामंत्री जयंत पाटील. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजीमंत्री बसवराज पाटील, आमदार विक्रम काळे, नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख आदी.
Aurangabad Rain Updates: औरंगाबादच्या काही भागात हलकासा पाऊस

बसवराज पाटील माझ्या अंतःकरणातले

मी व बसवराज पाटील यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात एकत्रित काम केले आहे. विधानसभेत आम्ही दोघांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयावर चिंतन करुन ते तडीस नेले. माझा व बसवराज पाटलांचा असलेला हा स्नेह माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांनी जुळवून आणला होता. तोच स्नेह आम्ही जरी वेगळ्या पक्षात काम करीत असलो तरी कायम असल्याची जाणीव जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी करुन दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com