Road Accident: धुळे सोलापूर महामार्गावर जीपचे टायर फुटून मोठा अपघात; अकरा जखमी, सहा गंभीर
Accident News: धुळे-सोलापूर महामार्गावरील महाकाळाजवळील शिवाजीनगर येथे जीपचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत ११ जण जखमी असून, सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.
अंकुशनगर/शहागड : धुळे- सोलापूर महामार्गावरील महाकाळाजवळील शिवाजीनगर येथे बुधवारी (ता.१३) दुपारी जीपचे टायर फुटल्याने जीप रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जाऊन खड्ड्यात जाऊन आदळली. यामध्ये अकरा जण जखमी झाले असून, यातील सहा गंभीर आहेत.