Accident
Accidentsakal

Vaijapur Accident : ‘समृद्धी’वर अपघातात तीन ठार; कुटुंबातील चौघे गंभीर

जीप ट्रकवर धडकून कुटुंबातील तिघांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना समृद्धी महामार्गावरील आगरसायगाव (ता. वैजापूर) शिवारात शुक्रवारी दुपारी घडली.

वैजापूर - जीप ट्रकवर धडकून कुटुंबातील तिघांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना समृद्धी महामार्गावरील आगरसायगाव (ता. वैजापूर) शिवारात शुक्रवारी दुपारी घडली. देवदर्शन करून हे कुटुंब परतत असताना ही दुर्घटना घडली.

कुमारी योगेश जाधव (वय २२), कमला वनसिंग राठोड (४०), वनसिंग धोंडीराम राठोड (४५) अशी मृतांची नावे आहेत. योगेश जाधव (३०, पोलिस कर्मचारी, नवी मुंबई), शीतल वनसिंग राठोड (२४), मयंक योगेश जाधव (वय २), नेहा वनसिंग राठोड (२२) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

खुलदाबाद येथील योगेश जाधव हा नवी मुंबई पोलिस दलात कळंबोली येथे कार्यरत आहे. योगेश आणि त्याची पत्नी कुमारी, मुलगा मयंक यांच्यासह सासू, सासरे आणि वहिनी हे नाशिकहून समृद्धी महामार्गाने जीपने (स्कॉर्पिओ- एमएच २०, बीसी ५७५७) देवदर्शन करून घरी परतत होते. दरम्यान, महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आगरसायगाव शिवारात योगेशचा ताबा सुटल्याने जीप ट्रकवर धडकली.

यावेळी भरधाव जीपनचे मागची चाके निखळून बाजूला फेकली गेली. या अपघातात कुमारी जाधव, कमला राठोड तसेच वनसिंग राठोड जागीच ठार झाले होते. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविले.

दरम्यान, महामार्गावर घटनेनंतर आसरा फाउंडेशनचे वाहेद पठाण, यासीन शाह, नदीम हाजी, जाकीर शेख, पोलिस कर्मचारी संजय जारवाल, प्रमोद गरड आदींनी धावपळ करत मदतकार्य केले.

कंदुरीला गेले होते...

पोलिस कर्मचारी योगेश जाधव यांच्यासह अन्य सदस्य नाशिक जिल्ह्यातील वडांगळी येथील सीतामाता मंदिरात दर्शनासाठी गेले होते, येथे कंदुरीचा कार्यक्रम आटोपून परतताना ही दुर्घटना घडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com