जेट विमानसेवा रद्द झाल्याने औरंगाबादचे मोठे नुकसान   

प्रकाश बनकर
रविवार, 19 मे 2019

कोर्गो सेंटरही बंद पडले... 
विमानतळ प्राधिकरणाने जीवाची बाजी लावून नवनवीन कंपन्या इंथे आण्यासाठी प्रयत्न केले. यातून प्राधिकरणाला यशही आले. देशा अंतर्गत एअर कार्गो सेवा सुरुही झाली. यातून नियामीत काही टन मालाची वाहतूकीही सुरु झाली होती. जेटची सेवा बंद पडल्यामूळे एअर कार्गोसेवेवरही मोठा परिणाम जाणवला आहे. जेटची एअर कोर्गोसेवाचे सेंटर पुर्णपणे बंद पडले आहेत. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. यासाठी राजकीय नेत्यांनी पुढे येण्याची गरज आहे. 

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नियमीत उड्डाण होणारे जेटची विमानसेवा रद्द झाल्यामूळे औरंगाबादचे मोठे नुकसान झाले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा या विमानतळावरून देण्यात आली आहे. मोठी क्षमता असतानाही केवळ विमान कंपनी आणि राजकीय उदासिनता नवीन सेवा या विमानतळाकडे येत नाही. विमानतळ प्राधिकरणातर्फे सातत्याने नवीन सेवेसाठी पाठपुरावा केला जात असला तरी त्यास राजकीय पाठबळ मिळत नसल्यामूळे प्रगतीकडे जाणारे औरंगाबाद पिछाडीवर पडत असल्याची चर्चा होत आहे. 

भव्य टर्मिनल बिल्डींग, सर्वसोयी सुविधा, डोमेस्टिक एअर कार्गो, अंतरराष्ट्रीय एअर कार्गोची सुविधाची क्षमता असणारे या विमानतळावरून आता केवळ एअर इंडिया आणि ट्रूजेटची विमानसेवा सुरु आहे. नियमीत असलेली जेट एअरवेज कंपनी उड्डाण बंद झाल्यामूळे सकाळच्या विमानाने जाणारे 80 ते 100 प्रवाशांनी इतर साधानाचा उपयोग करीत प्रवास करीत आहेत. ऐतिहासिक अजिंठा-वेरूळ लेणी, बिबिका मकबरा, पानचक्‍की हे ऐतिहासिक वारसा असलेल्या औरंगाबादेत देश-विदेशातून हजारो पर्यटक येतात. ही सेवा बंद झाल्यामूळे यांच्यावर परिणाम जाणवत आहे.

राज्यात एकीकडे कोल्हापूर सारखे छोटे विमानतळावरून नवीन विमानसेवा सुरु होऊन ती दणक्‍यात सुरु असताना औरंगाबादची मात्र पिछेहाट होत आहे. यास सर्वस्वी राजकीय परिस्थिती जाबाबदार आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांपैकी प्रमुख मंत्री औरंगाबाद विमानतळवरून नियमीत ये-जा करतात. त्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे सध्याची स्थिती आहे. एक-दोन लोकप्रतिनिधी सोडता कोणीही नवीन विमानसेवा विषयी बोलत नाही. ऑरिकच्या माध्यमातून जगभरातील गुंतवणूक औरंगाबादेत आणण्याचा प्रयत्न होत असताना विमानसेवा वाढण्याऐवजी कमी होणे हे विकासाच्या दुष्टीने घातक गोष्ट आहे. यापुर्वी स्पाईस जेटची विमानसेवा बंद पडली होती. तेव्हापासून ट्रूजेट सोडता एकही नवीन विमानसेवा औरंगाबादेत सुरु झाली नाही. 

कोर्गो सेंटरही बंद पडले... 
विमानतळ प्राधिकरणाने जीवाची बाजी लावून नवनवीन कंपन्या इंथे आण्यासाठी प्रयत्न केले. यातून प्राधिकरणाला यशही आले. देशा अंतर्गत एअर कार्गो सेवा सुरुही झाली. यातून नियामीत काही टन मालाची वाहतूकीही सुरु झाली होती. जेटची सेवा बंद पडल्यामूळे एअर कार्गोसेवेवरही मोठा परिणाम जाणवला आहे. जेटची एअर कोर्गोसेवाचे सेंटर पुर्णपणे बंद पडले आहेत. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. यासाठी राजकीय नेत्यांनी पुढे येण्याची गरज आहे. 

सध्या सुरु असलेली विमान सेवा 
कंपनी------------------मार्ग---------------------------वेळ 
एअर इंडिया(ए-442)--- मुंबई-औरंगाबाद-दिल्ली ------ सायंकाळी 4:45 वाजता 
ट्रुजेट(211)-------- औरंगाबाद- हैदराबाद----------सायंकाळी 6.वाजता 
एअर इंडिया(ए-441)------दिल्ली-औरंगाबाद-मुंबई------ सायंकाळी 7:35 वाजता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jet airways flight cancelled in Aurangabad