

धाराशिव : बसस्थानकावर एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची रक्कम, दागिन्यांच्या चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. तुळजापूर बसस्थानकात एका महिलेचे नऊ लाख ७५ हजार रुपयांचे, तर धाराशिवच्या बसस्थानकात एका महिलेचे ३० हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.