जिंतूर : दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात; दोन जण गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

जिंतूर : दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात; दोन जण गंभीर

जिंतूर (जि.परभणी) : शहरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय समोर जिंतूर-येलदरी रस्त्यावर दोन दुचाकी एकमेकांना भिडल्याने दोन्ही दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.२२) सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे.

संजय पवार आणि हरीश कमिटे असे जखमींची नावे असून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मागील तीनचार महिन्यापासून तालुक्यात अपघातांची मालिका थांबता थांबत नसून यात आजच्या (ता.२२) अपघाताची आणखी भर पडली.

हेही वाचा: लोका सांगे ब्रम्हज्ञान; जागतिक वन दिनाच्या दिवशीच वृक्षांची कत्तल

मंगळवारी सकाळी शासकीय तंत्रनिकेतन समोरील रस्त्यावर तालुक्यातील पिंपळगाव काजळे येथील पंचेचाळीस वर्षीय संजय पवार आणि शेवडी येथील तीस वर्षीय हरीश कमिटे यांच्या अनुक्रमे एमएच १५, बीएफ २६८० आणि एमएच २२,डब्ल्यू ४२७४ क्रमांकाच्या दुचाकी समोरासमोर जोरात भिडल्याने झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाले.

यात दोन्ही दुचाकींचेही बरेच नुकसान झाले आहे. यावेळी अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी दोन्ही जखमींना आटोत टाकून शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.परंतु दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना परभणी येथे हलविण्यात आले आहे. दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Marathwadaaccident