esakal | जिंतूरमधील मोबाईल दुकान फोडणाऱ्या टोळीला मालेगावातून अटक- स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिंतूर येथील मोबाईल दुकाने ता. 10 नोव्हेंबर रोजी रात्री फोडण्यात आले होते. या  दुकानातून विविध कंपन्याचे 10 लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरीला गेले होते. या बाबत जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

जिंतूरमधील मोबाईल दुकान फोडणाऱ्या टोळीला मालेगावातून अटक- स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः जिंतूर मध्ये मोबाईल दुकान फोडून त्यातील 10 लाख रुपयांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता.22) ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून 26 मोबाईल हस्तगत केले आहेत. या टोळीकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जिंतूर येथील मोबाईल दुकाने ता. 10 नोव्हेंबर रोजी रात्री फोडण्यात आले होते. या  दुकानातून विविध कंपन्याचे 10 लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरीला गेले होते. या बाबत जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. आरोपीची गुन्हा करण्याची पध्दत ही मालेगाव (जि.नाशिक) येथील टोळीशी मिळती जुळती असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्या नुसार मालेगाव येथील गुन्हेगावर लक्ष

ठेवण्या सुरुवात केली. ज्या आरोपीवर संशय होता तो आरोपी मोबाईल वापरत नसल्याने तसेच तो सारखे आपला ठावठिकाणा बदलत असल्याने पोलिसांना तपासात अडचणी निर्माण होत होत्या. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्यासह सायबर शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गुलाब बच्चेवाड, पोलिस कर्मचारी हनुमंत जक्केवाड, शेख अजहर, दिलावर पठाण, श्री. घुगे, श्री.फारुखी, सय्यद मोबीन, श्री.खुपसे, सायबर शाखेचे गणेश कौटकर, राजेश आगाशे, श्री.व्यवहारे, जिंतूर पोलिस ठाण्याचे फौजदार रवि मुंढे, श्री.जोगंदड, श्री.हाके, श्री. नरवाडे, श्री.पौळ, श्री. क्षीरसागर यांनी केली.

हेही वाचाहिंगोली बसस्थानकाचे काम संथगतीने, प्रवाशांची होते गैरसोय

असा लागला गळाला आरोपी

चोरी केलेल्या मोबाईलपैकी एक मोबाईल वापरात येत असल्याचे व तो वापरकर्ता मालेगाव (जि.नाशिक) येथील असल्याची खात्री स्थानिक गुन्हे शाखेला झाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी संशयित आरोपीच खरा आरोपी असल्याचे सिध्द केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालेगाव येथे रवाना झाले. पोलिस पथकाने सायबर विभागाच्या मदतीने आरोपी मोहम्मद मुस्तफा अब्दुल रशीद (वय 34, रा, स्विस हायस्कुलच्या मागे, कमालपुरा, मालेगाव, जि.नाशिक) यास सापाळा रचून ताब्यात घेतले.

चोरलेले मोबाईल दिले पाहूण्यांना

आरोपी मोहम्मद मुस्तफा अब्दुल रशीद याने चोरी केलेल्या मोबाईल पैकी दोन मोबाईल त्याच्या बहिणीचा नवरा मोहम्मद मुजम्मील फारुख अहमद (वय 40, रा. नयापुरा, मालेगाव, जि.नाशिक) व दोन मोबाईल उबैदुर रहेमान मोहम्मद शरिक (वय 32, रा.नयापुरा, मालेगाव, जि.नाशिक) या दोन पाहुण्यांना दिले. या दोन्ही आरोपींना मोबाईलसह ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित मोबाईल आरोपी मोहम्मद मुस्तफा अब्दुल रशीद याच्या मालेगाव येथील घरातून जप्त करण्यात आले आहेत.

टोळीवर राज्यासह बाहेर राज्यातही गुन्हे

जिंतूरमधील मोबाईल दुकान फोडणारी टोळी ही अट्टल असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या टोळीवर यापूर्वी राज्यात व राज्याबाहेर जबरी चोरी, घरफोडी, शरीरविरुध्दचे अनेक गुन्हे यापूर्वी दाखल असून या आरोपीस मालेगाव येथून तडीपार करण्यात आलेले आहे.

- व्यंकटेश आलेवार, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image