जिंतूर-परभणी मार्गावर भीषण अपघात; धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार |Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

जिंतूर-परभणी मार्गावर भीषण अपघात; धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

जिंतूर ( जि.परभणी) : जिंतूर परभणी मार्गावर (JIntur-Parbhani Road) शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर मैनापुरी शिवारात अज्ञात वाहनांच्या धडकेत (Accident) दुचाकीस्वार ३२ वर्षीय युवक जागीच ठार (Death) झाला असून इतर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. गणेश एकनाथ देवकर (वय ३२) असे मृतकाचे नाव आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारार्थ परभणी येथे हलविण्यात आले आहे.

जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी चौकाच्या परिसरात हॉटेलचा व्यवसाय करणारा पांगरी (ता.जिंतूर) येथील गणेश देवकर हा हॉटेल बंद करून अशोक अर्जुन नेटके व भानू शंकर देवकर(वय ३२ व २५) या दोन मित्रांसोबत एमएच २२, एआर ५७१४ क्रमांकाच्या दुचाकीवरून गावाकडे जात असताना परभणी रोडवरील मैनापुरी शिवारात शेतातून रस्त्यावर आलेल्या अज्ञात वाहनाची जोराची धडक झाल्याने दुचाकीवरील गणेश देवकरचा जागीच मृत्यू झाला तर अशोक नेटके व भानू देवकर हे दोन युवक गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर

हेही वाचा: निपाणी : बेपत्ता इसमाचा तब्बल सात महिन्यानंतर शोध

शहरातील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी डॉ गरड, परिचारिका गावित, सोनवणे, राऊत आदींनी प्राथमिक उपचार केले परंतु दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना परभणी येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दीपक शिंदे,पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी घटनेचा पंचनामा केला. मात्र वृत्त लिहेपर्यंततरी अज्ञात वाहनाचा शोध लागला नव्हता.

Web Title: Jintur Parbhani Road Accident One Death

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Parbhaniaccidentdeath
go to top