निपाणी : बेपत्ता इसमाचा तब्बल सात महिन्यानंतर शोध

बेळगावच्या जनसेवा फाउंडेशनचे सहकार्य : कुटुंबीयांच्या केले स्वाधीन
Disappeared
DisappearedSakal

निपाणी : येथील घट्टे गल्लीतील मागील सात महिन्यापासून बेपत्ता (Disappeared) असणारा इसम शुक्रवारी (ता. २४) बेळगाव (Belgaon) येथे आढळून आला. रहेमतुल्ला बशीर हलगले (वय ३८, रा. घट्टे गल्ली, निपाणी) असे शोध लागलेल्या इसमाचे नाव आहे. जन सेवा फाउंडेशनच्या सहकार्याने रहेमतुल्ला यांचा शोध लागला असून आज शनिवारी (ता. २५) बेळगाव येथील कॅम्प पोलिसांच्या उपस्थितीत रहेमतुल्ला यांना त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केले.

याबद्दल माहिती अशी, रहेमतुल्ला हे १७ मे पासून मानसिक संतूलन बिघडल्याने बेपत्ता होते. कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला, तरी शोध लागला नव्हता. अखेर ५ आॅगस्ट २०२१ ला शहर पोलिसात हलगले कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. काल शुक्रवारी (ता. २५) रहेमतुल्ला प्रथम कातळशावळी दर्गा येथे सेवा फाउंडेशनच्या पथकाला आढळून आले. त्यानंतर पथकाने रहेमतुल्ला यांना कॅम्प येथील फौंडेशनच्या कार्यालयात आणले. येथे रहेमतुल्ला यांच्या भोजन व राहण्याची व्यवस्था फौंडेशनच्या सदस्यांनी केली. शिवाय फेसबूक व सोशल मिडीयावर रेहेमतुल्ला यांचा शोध लागल्याचा संदेश व्हायरल केला. त्यातून हलगले कुटुंबियांशी संपर्क झाला.

Disappeared
सोलापूर : मरवडे विषबाधा प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

आज (ता. २५) रेहेमथुल्ला यांना जनसेवा फौंडेशनने त्यांच्या कुटंबियांकडे सुपूर्द केले. यावेळी इंतायतुल्ला हलगले, समुल्ला हलगले, फजल अहमद सय्यद, जावेद कर्नाजी यांच्यासह सेवा फाऊंडेशनचे अल्लाबक्ष बेपारी, अकीब बेपारी, सतीश निंगाडे, गणेश देशपांडे, इम्रान पठाण, रशीद खान, ईसा बेपारी, सज्जाद बेपारी, सैफ माडीवाले, रफिक बंदर, नोमन मुकाशी, जोएब सदिकी आणि सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com