

Tragedy Near Jintur: Maternal Uncle and Nephew from Vasmat Killed in Car-Bike Collision
Sakal
हिंगोली : छत्रपती संभाजी नगर येथे दुचाकीने जात असलेल्या वसमत शहरातील मामा आणि भाच्याचा जिंतूर जवळील औंढा रस्त्यावर कारच्या धडकेत मृत्यु झाल्याची घटना रविवारी (ता.पाच) दुपारी एकच्या सुमारास घडली.वसमत शहरातील रितेश विष्णुपंत टाक( वय 40) यांचे भाचे मयूर रत्नाकर शहाणे (वय 30) हे दोघेजण आज वसमत येथुन एम एच 38 ए बी 4614 या दुचाकीने छत्रपती संभाजी नगर येथे जिंतूर मार्गे जात असताना जिंतूर तालुक्यातील मानधनी जवळ त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली.