
जिंतूर-परभणी रस्त्यावर एसटी- सुमोच्या अपघातात एक जण ठार
जिंतूर जि. परभणी : एसटी बस व टाटा सुमो यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तालुक्यातील कडसावंगी येथील २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.२१) रात्री १० च्या सुमारास शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर परभणी रोडवरील पांगरी पाटी जवळ घडली.तालुक्यातील कडसावंगी येथील सुनिल दत्तराव अंभोरे (वय २८) हा टाटा सुमो (क्रमांक एम.एच.२८, डि.५७७७) वाहन घेऊन परभणीच्या दिशेने जात असताना पांगरी पाटी जवळ परभणीहुन जिंतूरकडे येणारी बस (क्रमांक एम.एच.२० बि.एल. १७७७) यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन भिषण अपघात झाला. यात सुमो चालक सुनील अंभोरेचा जागीच मृत्यू झाला.तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
अपघाताची भीषणता इतकी होती की,सुमो चालकाचा मृतदेह स्टेरिंगमध्ये फसला होता. पोलीस व सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात, रुग्णवाहिका चालक विजय राठोड यांनी तब्बल एक तास प्रयत्न करून आपघातगस्तास बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डाॅ.हनीफ खान,सिस्टर गावीत यांनी तपासून मृत घोषित केले. शुक्रवारी (ता.२२) दुपारपर्यंत सदरील प्रकरणाची पोलीस ठाण्यात झाली नसल्याचे समजले
Web Title: Jintur Road Parbhani Accident One Killed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..