जिंतूर : 'त्या' व्यापाऱ्याची जामीनावर सुटका; पोलिसांशी हुज्जत घातल्याचे प्रकरण

संचारबंदीच्या काळात नियमाचे उल्लंघन करून दुकान चालू ठेवल्याच्या कारणावरून संबंधित व्यापारी प्रल्हाद बाबुराव टाकरस व पोलीस यांच्यात वाद झाला
court jintur
court jintur
Updated on

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : ता. २७ एप्रिल रोजी शहरातील शिवाजी चौकात (Jitur shivaji chouk) पोलिस व एका व्यापाऱ्यात बाचाबाचीचा प्रकार घडला होता. याविषयी जिंतूर न्यायालयाने (jintur court) सदर व्यापाऱ्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ता. ११मे जिल्हा न्यायालयाने या व्यापाऱ्याची जामिनावर (merchant bail) सुटका केली. (Jintur: 'That' trader released on bail; A case of arguing with the police)

संचारबंदीच्या काळात नियमाचे उल्लंघन करून दुकान चालू ठेवल्याच्या कारणावरून संबंधित व्यापारी प्रल्हाद बाबुराव टाकरस व पोलीस यांच्यात वाद झाला. त्यावेळी टाकरस यांनी पोलिसाचा हातातील काठी हिसकावून घेत त्यांच्याशी हुज्जत घातली होती. सदरची घटना घडल्यानंतर ता. पाच मे रोजी व्यापारी टाकरस यास पोलिसांनी ताब्यात घेऊन जिंतूरच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

हेही वाचा - परभणी : लसीकरणाची पुरवठ्याअभावी कासवगतीने वाटचाल

यानंतर त्यांचे वकील सूनील बुधवंत यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात टाकरस यांची बाजू मांडली. ॲड. बुधवंत यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मंगळवारी (ता. ११ मे) टाकरस यांची जामिनावर सुटका केली. सदरील बाचाबाचीचे प्रकरण त्यावेळी वेगवेगळ्या प्रसिध्दी माध्यमांमुळे जिल्ह्यात चर्चेत आले होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ambad Civic Body Removes Illegal Roadside Encroachments to Ease Traffic Congestion
MLC Basavaraj Patil Says He Earned Friends Across Politics, Promises Welfare for All
Gangapur Academic Achievement: Sunil Vaysal Awarded PhD in Commerce
Siddharth Nirpal secured second rank in Gangapur taluka, while Shravani Vaysal earned a place in the Chhatrapati Sambhajinagar district merit list.
Marathi News Esakal
www.esakal.com