

Maharashtra Governor Jishnu Dev Varma Reviews Drought Situation in Umarga
esakal
उमरगा (धाराशिव) : "दुष्काळी स्थिती ही कायमस्वरूपी समस्या नाही. सरकारच्या माध्यमातून यावर उपाययोजना सुरू आहेत. कठीण परिस्थितीत कसलाही वाद किंवा वितंडवाद न करता सामूहिक प्रयत्नांतून या आव्हानाचा सामना केला पाहिजे. सरकार आणि समाजाने एका विचाराने पुढे गेल्यास त्यातून सकारात्मक काम उभे राहील. दुष्काळात पाण्याचे महत्त्व कळते, मात्र मुबलक पाऊस किंवा अतिवृष्टीच्या काळात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे सामूहिक प्रयत्नांतून 'जलसंरक्षण' करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे," असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.