रिकाम्या खुर्च्यांनी घेतलेल्या मॉक इंटरव्ह्यूने मला यश मिळाले : न्यायमूर्ती डिगे

रिकाम्या खुर्च्या मांडून दिला मॉक इंटरव्ह्यू..! न्यायमुर्ती डिगे यांच्या करिअरचा प्रवास
Justice Shivkumar Dige
Justice Shivkumar Digeesakal

लातूर : जिल्हा न्यायाधीश पदाच्या मुख्य परीक्षेत यश मिळवल्यानंतर मुलाखतीची तयारी सुरू केली. त्यासाठी अनेकांनी मार्गदर्शन केले. मुलाखतीत सादरीकरण व आत्मविश्वास पाहिला जातो. यामुळे मार्गदर्शकांच्या साहाय्याने मॉक इंटरव्ह्यूचे नियोजन केले. मात्र, मार्गदर्शकच आले नाहीत. ग्रंथालयात कायद्याच्या पुस्तकासमोर पाच रिकाम्या खुर्च्या मांडल्या. मीच बाहेर येऊन `मे आय कम-इन` म्हटले आणि कोणत्याही पुस्तकावर हात ठेवून सेक्शन सांगायचो आणि खुर्च्यासमोर येऊन उत्तर द्यायचो. या रिकाम्या खुर्च्यांनी घेतलेल्या मॉक इंटरव्ह्यूने मला यश मिळाले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे (Justice Shivkumar Dige) आपल्या करिअरचा प्रवास सांगत होते. (Justice Shivkumar Dige Share His Success Story In Latur)

Justice Shivkumar Dige
मेहुण्यावर ईडीच्या छाप्यानंतर मातोश्रीचे दरवाजे हलतायत, भाजपची ठाकरेंवर टीका

निमित्त होते जिल्हा वकील मंडळाने त्यांची न्यायमुर्ती निवड झाल्याबद्दल केलेल्या सत्काराचे. न्यायमूर्ती डिगे म्हणाले, सन २००७ मध्ये जिल्हा न्यायाधीशपदासाठी अर्ज केला. सकाळी ट्युशन, दिवसभर न्यायालयात काम करून रात्री उशिरापर्यंत वकील मंडळाच्या ग्रंथालयात अभ्यास केला. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालो. मुलाखतीसाठी अनेकांनी मार्गदर्शन केले. मात्र, मॉक इंटरव्ह्यू द्यावा, असे मनोमन वाटत होते. मार्गदर्शक न आल्याने रिकाम्या खुर्च्या मांडून मॉक इंटरव्ह्यूचा आभास निर्माण केला व तयारी केली. आयुष्याच्या वाटेवर मिळालेल्या संधीचे सोने केले. ध्येय साध्य करण्यासाठी त्यामागे धावणे आवश्यक आहे. रस्त्याकडे पाहून ध्येयाकडे गेल्यास ते मिळणार नाही. न्याय व्यवस्थेकडून खूप अपेक्षा आहे. व्यवस्था ही व्यक्ती नसून टीम आहे. न्यायव्यवस्था बळकट झाली तरच लोकशाही सक्षम होईल. पूर्वी ज्येष्ठ वकील मार्गदर्शन करत होते. मुंबई व पुण्याला कनिष्ठ वकील चांगले काम करतात. मराठवाड्यात ज्ञान कमी नाही. परंतू आपण कंफर्ट झोन सोडत नाहीत. न्यूनगंड बाजूला ठेवायला हवा. स्थित्यंत्तराशिवाय प्रगती नाही. ती इतरांना प्रेरणादायी असते. वकिली व्यवसाय हा प्रोफेशन आहे. तो बिझनेस होऊ नये. सेवाभावी वृत्तीने काम केल्यास न्याय व्यवस्था मजबूत होईल. या वेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र काळे, अॅड. अण्णाराव पाटील, अॅड. बळवंत जाधव, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर, संतोष देशपांडे यांनी डिगे यांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला.

Justice Shivkumar Dige
अमेरिकेकडून भारताला मोठी ऑफर, पंतप्रधान मोदी घेणार का पुढाकार?

वैशाली डिगे यांचेही यश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्या प्रयत्न यश मिळवत सध्या मंत्रालयात विधी व न्याय विभागाच्या अवर सचिव असलेल्या न्यायमूर्ती डिगे यांच्या पत्नी वैशाली म्हणाल्या, महिला कितीही मोठ्या पदावर गेली तरी तिच्या मागचा स्वयंपाक सुटत नाही. एवढे शिकून मला बुद्धीमत्ता गंजू द्यायची नव्हती. यामुळे अनेक पातळ्यावर एकाच वेळी कसरत करून करून निर्धार केला. ट्युशन व अन्य कर्तव्य पार पाडताना संसाराकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. पतींना दिलेल्या वचनाप्रमाणे एका वर्षात यश मिळवून दाखवले. माझ्या करिअरचा प्रवास मी स्वतःच्या हिमतीवर पार पाडला तरी त्यात पतींची साथ मोलाची होती.

कर्तृत्वाला वयाचा मर्यादा नसते

न्यायमूर्ती डिगे यांनी जिल्हा न्यायालयात वकील म्हणून केलेल्या अकरा वर्षातील आठवणींना उजाळा दिला. जिल्हा वकील मंडळाला सोनेरी पानाचा इतिहास आहे. दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांनी मुख्यमंत्री होणे सोपे, परंतू लातूर (Latur) वकील मंडळाचा अध्यक्ष होणे, कठीण असल्याचे सांगितले. त्यामुळेच धाडस दाखवत निवडणुकीत उडी घेतली व मंडळाच्या इतिहासात कमी वयाचा अध्यक्ष झालो. तेव्हा सर्वांनी दाखवलेल्या विश्वासमुळेच इथपर्यत मजल मारता आली. कर्तृत्वाला वयाची मर्यादा नसते, असे सांगत त्यांनी मित्रासमवेतचे अनेक किस्से सांगितले. वकील मंडळाकडून मला नेहमीच ऊर्जा मिळते. येथील सिनिअर वकील हे ज्युनिअर वकीलांना परिपूर्ण वकील बनवणारे गुरूकूल असल्याचेही न्यायमुर्ती डिगे यांनी आवर्जून नमुद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com