Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदेंकडून देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन
Santosh Deshmukh Case : अभिनेते सयाजी शिंदे यांनी संतोष देशमुख यांच्या चांगुलपणाचा आदर व्यक्त केला आणि विधायक काम करण्याची आवश्यकता सांगितली. देशमुख कुटुंबासोबत आम्ही राहू, न्याय मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न करू.
केज : ‘जे काय व्हायचे ते होत राहील. कोणी सुटणार नाही. न्याय मिळेल. आम्ही देशमुख कुटुबीयांसोबत आहोत. परंतु, संतोष देशमुख यांच्या अंगी असलेला चांगुलपणा डोळ्यांसमोर ठेवून विधायक काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.