Kalamb Municipal Politics
Sakal
कळंब : धाराशिवच्या राजकारणात झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीचे पडसाद आता कळंब नगरपालिकेच्या राजकारणात उमटू लागले आहेत.खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कळंबमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नऊ नगरसेवक नेमका कोणता झेंडा हाती घ्यायचा, या संभ्रमात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.त्यामुळे कळंब नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळत वर्तवली जात आहे.