

Kannad political parties struggle to finalize election candidate
sakal
संतोष निकम
कन्नड : युती अथवा आघाडी संदर्भातही कोणत्याही पक्षांची ठोस हालचाल सध्या शहरात दिसत नसल्याने आघाडी प्रक्रियेचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा हे महायुतीचे घटक पक्ष असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष कोल्हे व त्यांच्या पत्नी स्वाती कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेची सत्ता मागील पंधरा वर्षांपासून राहिली आहे. संजना जाधव या आमदार असल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार निश्चित करणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा असल्याचे मानले जात आहे. भाजपकडे देखील नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार की युतीतून हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.