kannad nagar parishad
sakal
- संतोष निकम
कन्नड - मुंबई येथे झालेल्या नगरपरिषदांच्या आरक्षण सोडतीकडे कन्नड शहरातील सर्वच राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. या सोडतीनुसार कन्नड नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला या वर्गासाठी राखीव झाले आहे.
या निर्णयानंतर शहरातील राजकारणात नवीन समीकरणांची चर्चा सुरु झाली असून, सोशल मीडियावर ‘भावी नगराध्यक्षा वहिनीसाहेब, ताईसाहेब’ अशा आशयाचे बॅनर मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत आहेत.