

Police Raid in Kannad on Banned Nylon Manja Seller
Sakal
कन्नड : शहरातील शिवनगर येथील एका घरासमोर असलेल्या मोकळ्या आवारात बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (ता.१०) सायंकाळी छापा टाकून ७,६४० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात शेख नासेर शेख कबीर (वय ५६, रा. शिवनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.