

Only Two Out of Six Centers Active for Maize MSP Registration
Sakal
कन्नड : तालुक्यातील तालुका खरेदी-विक्री संघ, जय भवानीमाता तेलबिया उत्पादक कंपनी (निंबोरा इन्स्टिट्यूट, चिकलठाण), मारोती महाराज तेलबिया उत्पादक सहकारी संस्था (हतनूर), शनैश्वर तेलबिया उत्पादक सहकारी संस्था (मेहगाव), ओमशांती भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी संस्था (अंधानेर फाटा) आणि श्री स्वामी समर्थ कामगार सहकारी संस्था (पळसगाव) - या सहा शासकीय केंद्रांवर २९ नोव्हेंबरपासून हमीभावाने मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात तालुका खरेदी-विक्री संघ आणि श्री स्वामी समर्थ कामगार सहकारी संस्था, पळसगाव या फक्त दोनच केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.