
Kannad Crime
Sakal
कन्नड : शहरात घडलेल्या सोनसाखळी चोरी प्रकरणाचा अवघ्या दोन दिवसांत उलगडा करत कन्नड शहर पोलिसांनी बुधवारी (ता.१०) दोन आरोपींना गजाआड केले. त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख ७० हजार रुपये किमतीची अडीच तोळ्यांची सोनसाखळी हस्तगत करण्यात आली आहे.