Beed News: भेगा पडलेला भाग कोसळला; कपिलधारवाडीतील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण कायम
Landslide Risk: बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडी गावातील नागरिक भूकंपीय आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे मंदिर परिसरात स्थलांतरित झाले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून तातडीने पुनर्वसनाची आवश्यकता असून, अद्याप जनावरे आणि नागरिकांसाठी ठोस उपाययोजना झालेली नाही.
बीड : कपिलधारवाडी गावातील नागरिक गेल्या बारा दिवसांपासून कपिलधार मंदिर परिसरात वास्तव्य करत आहेत. आता चक्क रस्त्याच्या आजूबाजूने तब्बल आठ फूट भेगा पडल्या असून भाग ढासळत आहे.