ST Protest: थांबा नसल्याचे कारण पुढे करून विद्यार्थ्यांना पावसांत ताटकळत ठेवल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी रोखल्या एसटी बसेस

करडगावच्या विद्यार्थ्यांचा एसटीच्या मनमानीविरोधात ठिय्या; अधिकृत थांबा नसल्याचे कारण देत बसप्रवेश नाकारल्याने पाचोड बसस्थानकात पाऊणतास बसेस ठप्प
The protest halted buses to Ambad and Jalna for nearly 45 minutes, highlighting concerns over student transportation and public service.

The protest halted buses to Ambad and Jalna for nearly 45 minutes, highlighting concerns over student transportation and public service.

Sakal

Updated on

पाचोड : करडगाव (ता.अंबड) येथे अधिकृत थांबा नसल्याचे कारण पुढे करून विद्यार्थ्यांना वारंवार बसमध्ये प्रवेश नाकारणाऱ्या आणि त्यांच्याशी उद्धट वर्तन करणाऱ्या एसटी चालक-वाहकांच्या मनमानी विरोधात संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता.२१) अखेर तीव्र आंदोलन छेडत पाचोड (ता.पैठण) येथील बसस्थानकात अंबड व जालन्याकडे जाणाऱ्या पैठण व अंबड आगाराच्या बसेस तब्बल पाऊण तास रोखून ठेवत राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराचा निषेध केला. दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे बसस्थानकात मोठी गर्दी झाली. अखेर शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com