Contractor Murder Case Solved Karmad News : कंत्राटदार इंद्रजित खुळे यांच्या खून प्रकरणाचा पर्दाफाश; अपहरण करून निर्घृण हत्या करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोघांना बेड्या

UP Duo Arrested in Karmad Murder Case : लोखंडी पाइप व सिमेंटच्या विटांनी वार करत मृतदेह पेट्रोल ओतून जाळल्याची थरारक घटना; तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू, हत्येमागील गूढ कायम
Brutal murder after abduction, body burnt using petrol

Brutal murder after abduction, body burnt using petrol

Sakal

Updated on: 

बाळासाहेब काळे

करमाड : करमाड एमआयडीसी परिसरातील चेंबरमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या कंत्राटदार इंद्रजित बाबूराव खुळे (वय ५१, रा. गोलटगाव) यांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वीरीत्या उलगडा केला आहे. अपहरण करून लोखंडी पाइप आणि सिमेंटच्या विटांनी डोक्यावर वार करीत त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह चेंबरमध्ये टाकून पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Loading content, please wait...