Ganeshotsav Police Guidelines : करमाडमध्ये गणेश मंडळांना पोलिसांचा सल्ला; डीजेचा दणदणाट टाळा, रक्तदानाचा आदर्श घडवा

गणेशोत्सवात डीजे, लेझरला पूर्ण विराम; पारंपरिक वाद्यांसह शांत, सुरक्षित आणि रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमांतून सण साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन
Karmad Police urge Ganesh mandals to avoid loud DJs and laser lights and promote social initiatives such as blood donation camps.

Karmad Police urge Ganesh mandals to avoid loud DJs and laser lights and promote social initiatives such as blood donation camps.

Sakal

Updated on

करमाड : गणेशोत्सव हा आनंद, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा सण आहे. त्यामुळे उत्सवाला गालबोट लागेल, असे कोणतेही कृत्य करू नये. शासनाच्या निर्देशांचे पालन करून डीजेचा वापर टाळावा आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणेशोत्सव साजरा करावा. तसेच गणेश मंडळांनी लेझर लाईटचा वापर टाळून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेणाऱ्या गणेश मंडळांना पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com