
Dhananjay Munde Faces Allegations from Karuna Munde Over Misuse of Funds and Caste Politics
Esakal
बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी सभेतून मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघात केला. याला मनोज जरांगे पाटील यांनी उत्तरही दिलं. दरम्यान, करुणा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मला न्याय मिळावा अशी मागणी केली. माझ्या लढाईत सोबत रहा अशी विनंती केल्याचं जरांगेंना सांगितलं. पण जरांगे पाटील यांनी मी महिलांना पुढे करत नाही, धनंजय मुंडेंसाठी मी सक्षम आहे असं सांगण्यात आल्याचंही करुणा मुंडे यांनी सांगितलं. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे हे समाजातील लोकांची माथी भडकावतात, जातीपातीचं राजकारण करतायत. समाजाला पुढे करतात पण स्वत: पुढे होत नाहीत अशी टीकाही करुणा मुंडे यांनी केली.