esakal | करुणा शर्मा सहा महिला कैद्यांसोबत बीडच्या कारागृहात
sakal

बोलून बातमी शोधा

karuna munde

करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली

करुणा शर्मा सहा महिला कैद्यांसोबत बीडच्या कारागृहात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड: न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा सध्या जिल्हा कारागृहात आहेत. इतर पाच महिला कच्च्या कैद्यांबरोबरच त्यांचाही महिला विभागात मुक्काम आहे. तर, त्यांचे चालक अरुण मोरे यास मंगळवारी (ता. सात) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. फेसबुकवर जाहीर केल्या प्रमाणे करुणा शर्मा - मुंडे रविवारी (ता. पाच) पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आल्या. त्यांच्यासह चालक अरुण मोरे यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी व जीवे मारण्याचा प्रयत्न आणि मोरेवर पुन्हा पिस्तूल प्रकरणी गुन्हा नोंद झाला. परळी पोलिसांनी दोघांना अटक करुन सोमवारी (ता. सहा) अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एस.स. सापतनेकर यांच्यासमोर हजर केले.

करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. सोमवारचा त्यांचा मुक्काम कारागृहातच झाला असून मंगळवारची (ता. सात) रात्रही त्यांना कारागृहातच घालवावी लागली. इतर पाच महिला कच्चे कैदी व करुणा शर्मा असे सहा महिला कच्चे कैदी कारागृहात आहेत. त्यांना भेटण्यासाठी दोन दिवसांत कोणीही आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. वास्तविक कोरोनामुळे कारागृहातील भेटीही बंद आहेत.

हेही वाचा: मराठवाड्यात पावसाचा हाहाकार! सहा दिवसांत ६६४ पशुधनांचा बळी

दरम्यान, करुणा मुंडे यांच्या जामिनासाठी मुंबई येथून वकील आले असून त्यांनी कारागृहात जाऊन करुणा शर्मा यांच्या वकीलपत्रावर सह्या घेतल्या. आता वकिलामार्फत त्या जामिनासाठी अर्ज करणार आहेत. दरम्यान, एक दिवसांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर अरुण मोरेला मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.

loading image
go to top