esakal | करुणा शर्मांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, १८ सप्टेंबरला सुनावणी
sakal

बोलून बातमी शोधा

करुणा शर्मा

करुणा शर्मांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, १८ सप्टेंबरला सुनावणी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बीड - करुणा शर्मा (Karuna Sharma) यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. तपास अधिकारी व फिर्यादी आंबेजोगाई न्यायालयात हजर न झाल्याने आज मंगळवारी (ता.१४) शर्मा यांच्या जामीनावरील (Beed) सुनावणी झाली नाही. ती येत्या १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. आज आंबेजोगाई न्यायालयात (Ambajogai Court) जामीनावर सुनावणी होणार होती. ती फिर्यादीचा जबाब नोंदवायचा राहिल्याने पुढे ढकलण्यात आली आहे.

हेही वाचा: चिमुरड्याला दवाखान्यात नेताना भीषण अपघात, आई अन् काकाचा मृत्यू

करुणा शर्मा यांना जास्तीत जास्त तुरुंगात राहावे असा उद्देश असल्याचे शर्मा यांच्या वकीलाने माध्यमांना सांगितले. राज्यात करुणा शर्मा यांच्या अटकेवरुन चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही भाष्य केले होते.

loading image
go to top