esakal | चिमुरड्याला दवाखान्यात नेताना भीषण अपघात, आई अन् काकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

चिमुरड्याला दवाखान्यात नेताना भीषण अपघात, आई अन् काकाचा मृत्यू

चिमुरड्याला दवाखान्यात नेताना भीषण अपघात, आई अन् काकाचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बीड : बीड-परळी (Parli Vaijinath) मार्गावरील जरुड फाट्यावर दोन जीपची समोरासमोर झालेल्या जोराच्या धडकेत दीर, भावजय ठार, चिमुकल्यासह वडील बचावले. ही घटना मंगळवारी (ता.१४) पहाटे तीनच्या सुमारास घडली. तापेने त्रस्त चिमुकल्याला दवाखान्यात जीपमधून घेऊन जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. रवि नागोराव मिटकर ( वय २६), सोनाली माधव मिटकर ( वय ३०), अशी मृत दीर- भावजयचे नाव (Accident In Beed) आहे. जीपचा चालक विशाल अर्जुन मिटकर (२७) हा जखमी झाला आहे. माधव नागोराव मिटकर ( वय ३५) व गौरव माधव मिटकर ( वय दोन) ही दोघे बापलेक बचावले आहेत. बीड (Beed) तालुक्यातील घाटसावळी तांडा येथील मिटकर कुटुंबातील चिमुकल्या गौरव रात्री तापाने त्रस्त होता.

हेही वाचा: दारुसाठी पैसे न दिल्याने मित्राचा खून, औरंगाबादेतील घटना

त्यामुळे त्याला उपचारासाठी पहाटे तीन वाजता घेऊन कुटुंबीय जीपमधून बीडला निघाले. भूमकडून परळीकडे भाजीपाला घेऊन जीप जात होती. दोन्ही जीपची बीड-परळी मार्गावरील जरुड फाट्याजवळ समोरासमोर जोराची धडक झाली. यात जीप उलटल्याने रवि मिटकर व सोनाली मिटकर जागीच ठार, तर चालक अर्जुन मिटकर जखमी झाला. यात माधव मिटकर व त्यांचा चिमुरडा मुलगा गौरव बचावले आहेत.

loading image
go to top