

Navshya Ganpati Remains All Year
sakal
कासारी बाजार: दहा दिवसांच्या उत्सवानंतर गणरायाला निरोप देण्याची प्रथा सर्वदूर रूढ आहे. पण, कासारी बाजार गणेश मंडळाचा ‘श्री नवश्या गणपती’ मात्र वर्षभर भक्तांच्या भेटीसाठी विराजमान असतो. नवसाला पावणारा गणपती अशी भाविकांची श्रद्धा असलेल्या या गणरायाच्या चरणी वर्षभर भक्तांची वर्दळ असते. तीन दशकांहून अधिक काळाची ही अनोखी परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात असून, गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत संपूर्ण बाजारपेठ एकवटून उत्सव साजरा करण्याची परंपराही कासारी बाजारच्या सांस्कृतिक एकोप्याची साक्ष देत आहे.