Gangapur News : साडे चारशे कोटींच्या निधीतून कायगाव ते देवगाव प्रशस्त रस्ता होणार

वैजापूर, गंगापूर रस्त्याप्रमाणेच कायगाव-देवगाव रस्त्याचे देखील भाग्य उजळणार असून, जागतिक बँक प्रकल्पाच्या योजनेत या रस्त्याचा समावेश झाला आहे.
MLA Prashand Bamb
MLA Prashand Bambsakal

गंगापूर - वैजापूर, गंगापूर रस्त्याप्रमाणेच कायगाव-देवगाव रस्त्याचे देखील भाग्य उजळणार असून, जागतिक बँक प्रकल्पाच्या योजनेत या रस्त्याचा समावेश झाला आहे. साडे चारशे कोटींच्या निधीच्या माध्यमातून हा रस्ता होणार आहे. गंगापूर, लासुर शहरात पूल घेण्यात आले आहेत.

आमदार प्रशांत बंब यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत यशस्वी पाठपूरावा केला आहे. शासनामार्फत प्रकल्प अहवाल सादर करण्याची निविदा निघून सोमवारी (ता. चार) पासून शहरात सर्वेचे काम सुरू झाले आहे. यापूर्वी ४३२ कोटींच्या निधीतून वैजापूर, गंगापूरमार्गे करमाड असा दर्जेदार, प्रशस्त रस्ता तयार झाला आहे. त्या गुणवत्तेचाच हा रस्ता होणार असल्याने संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे.

तालुक्यातील गंगापूरसह, लासुर स्टेशन गावातून जाताना दोन्ही ठिकाणी पुलाचे देखील काम होणार आहे. विविध पायाभूत प्रकल्पांमध्ये आर्थिक गुंतवणुकीसाठी जागतिक बँक पुढाकार घेत असतानाच शहरातील दोन प्रकल्पांसाठी अर्थसहाय्यासाठी जागतिक बँकेनेही रस दर्शवला आहे.

यापूर्वी कायगाव ते देवगाव असा ५७ कोटींचा प्रशस्त रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, रस्त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने संबंधित गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

शहरात पूल नको, रिंगरोड विकसित करा

जागतिक बँक प्रकल्पामार्फत प्रस्तावित रस्त्यात शहरातून पूल घेण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, संपूर्ण शहरातून पूल गेल्यास बाजारपेठेवर मोठा परिणाम होत असतो. शहरालगतच असलेला शंभर फूटी रिंगरोड विकसित करण्याची गरज असल्याचे शहरातील नागरिक व व्यापारी म्हणतात.

कायगाव ते देवगाव रस्ता सर्वेची निविदा निघाली असून, प्रशस्त रस्त्याचा अहवाल बनविण्याचे काम सुरू आहे. साडे चारशे कोटीच्या निधीतून हा रस्ता होणार आहे. वैजापूर रस्त्याप्रमाणेच या रस्त्याचे काम होणार आहे.

- एम. एल. आझमी (उपभियंता, जागतिक बँक प्रकल्प)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com