
बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याचा जामीन, याच प्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे याला या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे, या मागणीच्या अर्जांवर सोमवारी (ता. १८) येथील विशेष मकोका न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलांचा तीन तास युक्तिवाद झाला. या दोन्ही अर्जांवरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला असून, ३० ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.