Marathwada: गोदा आटताच दिसू लागते खडकुलीचे तीर्थक्षेत्र; पाणलोट क्षेत्रात स्थान, पावसाळ्यात मंदिर परिसर होतो जलमय

Khadkuli Pilgrimage Site Reappears as Water Level Drops: जायकवाडी धरणातील पाणीपातळी कमी होताच गोदावरी नदीपात्रातील खडकुली तीर्थक्षेत्र पुन्हा दर्शनास येते.
Marathwada

Marathwada

esakal

Updated on

कायगाव: जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील गोदावरी नदीपात्रात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेले व महानुभाव पंथाचे महत्त्वाचे असे खडकुली तीर्थक्षेत्र आहे. पावसाळ्यानंतर पूर्णपणे जलमय होणारे हे तीर्थक्षेत्र उन्‍हाळ्यात गोदावरीची पाणी पातळी कमी होताच दिसू लागते. याठिकाणी भाविक दर्शनासाठी आवर्जून येतात. अर्थात याठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता, पूल नसल्याने चक्क थर्माकोलच्या तराफ्यावरून नदीपात्र ओलांडून भाविक दर्शनासाठी जाताना दिसतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com