agriculture loss in parli vaijnath by heavy rain
sakal
परळी वैजनाथ - गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून सोमवारी (ता. २२) दोन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. पहिल्याच अतिवृष्टीचे पंचनामे झाले नसुन पुन्हा अतिवृष्टी व अतिवृष्टी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी अस्मानी संकटामुळे अडचणीत सापडला आहे.