फुलंब्री - फुलंब्री तालुक्यामध्ये २०२५-२६ या आर्थिक वर्षात खरीप पिकांच्या लागवडीला सुरुवात झाली असून आतापर्यंत 51 हजार 113 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. यंदा पावसाने सुरवातीलाच चांगली हजेरी लावल्याने खरीप पिकांची शेतकऱ्यांकडून झपाट्याने झाली आहे. मात्र यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्क्याने कपाशीचे क्षेत्र घटले आहे. तर मकाचे क्षेत्र वाढले आहे.