Kherda Mini Dam water project
sakal
पाचोड - उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाचोड (ता. पैठण) परिसरातील सर्व नदी -नाले, विहीरी, तलावाची पाणी पातळी खालावली असून खेर्डा लघूप्रकल्प कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. सोबतच परिसरातील पाणीपुरवठा योजनांची तहान भागविणारे एकतुनी, दादेगाव - दावरवाडी, खेर्डा (ता. पैठण) या लघु प्रकल्पात जेमतेम पाच टक्के पाणी राहून परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. दरवर्षी शेतकरी संपादीत क्षेत्रात ज्वारी व हरभऱ्याची पेर साधत असे. यंदा प्रथमच हे संपादित क्षेत्र नापेर राहिले.