किल्लारी (जि. लातूर) : किल्लारीतील प्रलयकारी भूकंपाला आज ३२ वर्षे झाली, तरी त्या रात्रीचा थरकाप आजही आठवणीत जिवंत आहे. हजारो जीव गमावणारा भूकंप गावागावातील लोकांच्या मनात खोलवर कोरला गेला आहे. .ती काळरात्र आजही अंगावर शहारे आणणारी आहे. आजही किल्लारी परिसरातील ५२ गावे मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत. पुनर्वसनाची वचने केवळ कागदांपुरतीच मर्यादित राहिली आहेत..३० सप्टेंबर १९९३च्या त्या काळरात्री गणेश विसर्जन करून लोक झोपी गेले होते. पहाटे ३.५६ मिनिटांनी झालेल्या प्रलयकारी भूकंपाने जिकडे-तिकडे आरडाओरड, रडण्याचे, किंकाळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. ते आवाज आणि गावभर पसरलेला धुराचा लोळ पाहून प्रत्येकाला रडू कोसळले. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच लोक रडत एकमेकांना आपले दुःख व ढिगाऱ्याखाली गाडलेल्या नातेवाइकांचे ठिकाण दाखवत होते. प्रत्येक जण ढिगाऱ्याखाली कुटुंबातील गाडलेले आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुले, नातेवाईक यांचा शोध घेत होते. जसा जसा सूर्योदय होत गेला; तसे लोक, परगावी असलेले नातेवाईक मदतीसाठी येऊ लागले. वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था मदतीला धावून आल्या..लोक घर, गाव सोडून किल्लारी पाटीच्या दिशेने घाबरून धावू लागले. अंत्यसंस्कारासाठीही गावात जागा शिल्लक नव्हती. बघावं तिकडे उद्ध्वस्त स्थितीतील घरे होती. गावातील एकाच खुल्या जागेवर एकाच वेळी अनेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दफनविधीही अशाच पद्धतीने करण्यात आला. अनेक शव एकत्र दफन करण्यात आले. यावेळी जात, धर्म, पंथ हा विषयच नव्हता. या भूकंपात लातूर, धाराशिव जिल्ह्यांतील तब्बल ५२ गावे उद्ध्वस्त झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी ठरला. .त्यामुळे या परिसरात सर्वाधिक जीवित व मालमत्तेची हानी झाली. अनेक गावे जमीनदोस्त झाली. गावोगावी अंत्यसंस्कारांचे ढीग, आक्रोश, वेदना आणि असह्य दु:खाचा काळा दिवस लोक विसरू शकलेले नाहीत. गावागावांतील शेकडो घरांचा खचून ढिगारा झाला. अनेक शेतकरी, महिला, मुले व वृद्ध या दुर्घटनेत कायमचे हरपले. या भीषण आपत्तीत नऊ हजार ७४८ जणांना प्राण गमवावे लागले, तर हजारो जखमी झाले होते. ३२ वर्षांनंतरही त्या भूकंपाच्या आठवणींनी लोकांच्या अंगावर शहारे येतात..killari Earthquake: सर्वस्व गमवूनही किल्लारीकर पुन्हा उभा; परस्परांना साहाय्य करत शेती अन् व्यवसायाची उभारणी, गावांनीही कात टाकली.भूकंपमापक केंद्र बनले शोभेची वास्तूभूकंपानंतर पुनर्वसित गावामध्ये भूकंप झाल्याची नोंद राहावी, त्याद्वारे प्रशासन व ग्रामस्थ सतर्क होतील, या हेतूने किल्लारीत भव्य इमारत बांधण्यात आली. त्यात भूकंपमापन यंत्र बसविले. मात्र, तेथे कुठलेही अधिकारी, कर्मचारी फिरकत नसल्याने ही वास्तू शोभेची बनली आहे. केवळ ३० सप्टेंबरला अधिकाऱ्यांना इमारतीची आठवण होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.