esakal | लातूर : किल्लारी भूकंपातील मृतांना श्रद्धांजली अर्पण, दुर्घटनेला पूर्ण झाली २७ वर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Killari Earthquak

लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील प्रलयंकारी भूकंपाच्या घटनेला  आज २७ वर्षे पूर्ण झाली

लातूर : किल्लारी भूकंपातील मृतांना श्रद्धांजली अर्पण, दुर्घटनेला पूर्ण झाली २७ वर्ष

sakal_logo
By
विश्वनाथ गुंजोटे

किल्लारी (जि.लातूर) : लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील प्रलयंकारी भूकंपाच्या घटनेला आज बुधवारी (ता.३०) २७ वर्षे पूर्ण झाली. ही घटना ३० सप्टेंबर १९९३ रोजी घडली. किल्लारी येथील स्मृतीस्तंभ या ठिकाणी आमदार अभिमन्यु पवार, तहसीलदार शोभा पुजारी, सरपंच शैलाताई लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत भूकंपातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच डॉ. शंकरराव पडसाळगे, वैद्यकीय अधिकारी सचिन बालकुंदे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शरद भोसले, मुख्याध्यापक सतीश भोसले, सहायक पोलिस निरीक्षक विनोद म्हेत्रेवार, जयपाल भोसले, उपसरपंच युवराज गायकवाड, वन विभागाचे जिल्हा रेंजर सचिन रामपुरे, व्ही. व्ही. नारंगवाडे, तालुका वनाधिकारी गणेश शेवाळे, सिताराम शिंदे, राहुल शिंदे, नाना गायकवाड, शरद ससाने यांची प्रमुख उपस्थिती होती. बुधवारी सकाळी ८ वाजता पोलिसांनी हवेमध्ये बंदुकीच्या तीन राऊंड फायर करून सलामी देण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी भूकंपातील मृतांना श्रद्धांजली अर्पण वाहण्यात आली.

त्यानंतर आमदार पवार यांनी सकाळमधील बातमी वाचन करत उपस्थित ग्रामस्थांकडुन भुकंपग्रस्तांचा इतिहास जाणून घेतला. या प्रसंगी मुख्याध्यापक सतीश भोसले, बिसरसिंग ठाकूर यांनी भूकंपातील अनुभवाचे कथन केले. यात किल्लारी सह परिसरातील नागरिक उपस्थित राहून या भागातील वेगळ्या समस्यांची व्यथा आमदारांच्या समोर मांडल्या. गावामध्ये ६५ किलोमीटरचा अंतर्गत रस्ता असून अद्याप त्यावर डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रिटीकरण झालेले नाही.

येथील बसस्थानकाचा प्रश्न, भूकंपग्रस्त राजेगाव ऐकुंडी या गावांना जोडणारा रस्ता, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान तसेच शालेय शिक्षणात होणारा मोबाईल नेटवर्कचा अडथळा, शासकीय नोकरीतील अनुशेष या समस्या सोडवण्याचे साकडे घातले. आमदार पवार म्हणाले, यातील काही समस्या नागपूर येथील अधिवेशनात मांडलेल्या आहेत. उर्वरित समस्या यापुढे मांडत राहू. आपल्या भागाच्या विकासासाठी निश्चित पुढाकार घेत आहे.

लातूर भूकंपानंतरची २७ वर्ष ! 

पुढे घेईन. स्मृतिस्तंभ येथील परिसर हा रमय झाला आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या वृक्षामुळे मोठे समाधान वाटत आहे. जेवणाचा डबा घेऊन येऊन काही काळ येथे घालवावा असे मनाला वाटत आहे. शाळा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी सहली योग्य ठिकाण असल्याचेही त्‍यांनी सांगितले. यावेळी तलाठी विजयकुमार कस्तुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, दिलीप लोहार, प्रवीण गारटे, मुकुंद पोतदार, आशोक गावकरेसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर